गणेश मंदिरातील ७० वर्षीय पुजाऱ्याची अज्ञातांकडून हत्या

27 Sep 2024 15:02:15

Rajasthan Poojari Death

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rajasthan Poojari Death)
राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात दशकानुवर्षे जुने असलेले गणेश मंदिर आहे. या मंदिराचे पुजारी सेलम भारती महाराज यांच्यावर दोन अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केल्याची घटना सोमवारी (२३ सप्टेंबर) रात्री घडली आहे.

हे वाचलंत का? : बांगलादेशात हिंदूंसह हिंदू देवताही असुरक्षित, कट्टरपंथ्याने दुर्गा मुर्तीची केली विटंबना

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या अज्ञातांनी वृद्ध पुजाऱ्याच्या अंगावर धारदार शस्त्राने २० वेळा वार केले. आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ तेथे पोहोचले आणि त्यांनी एका आरोपीला पकडले, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर जखमी पुजाऱ्याला सिरोही जिल्हा रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी पुजारी यांना मृत घोषित केले. जवळपास ३० वर्षांपासून पुजारी सेलम भारती महाराज गणेश मंदिरात सेवा आणि पूजा करत होते.

Powered By Sangraha 9.0