उघड्यावर नमाज अदा केल्याने गणपत विद्यापीठात मोठा वाद!

27 Sep 2024 16:23:14

Ganpat Vidyapith News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ganpat Vidyapith News)
गुजरातच्या मेहसाणा येथील गणपत विद्यापीठात काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी उघड्यावर नमाज अदा केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला, त्यानंतर मेहसाणातील हिंदू संघटनांनी विद्यापीठात निदर्शने करत याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. तरी पुन्हा उघड्यावर नमाज अदा करण्यात येणार नाही, असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे.

हे वाचलंत का? : गणेश मंदिरातील ७० वर्षीय पुजाऱ्याची अज्ञातांकडून हत्या

हिंदू संघटनांनी सुरुवातीला अखंड हनुमान चालिसाचे पठण केले. त्यानंतर गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून कॉलेज परिसर शुद्ध करून घेतला. विद्यापिठाच्या म्हणण्यानुसार नमाज पढणारे विद्यार्थी नवीन होते, त्यामुळे त्यांना नियमांची कल्पना नव्हती. अशी घटना पुन्हा होणार नाही, याबाबतचे आश्वासन हिंदू संघटनांना सध्या देण्यात आले आहे. आता हे संपूर्ण प्रकरण मिटले असल्याची माहिती आहे.

Powered By Sangraha 9.0