डेहराडून रेल्वे स्थानकात दोन गटांत तुफान राडा! नेमकं काय घडल?

27 Sep 2024 18:48:49

Dehradun Love Jihad Case

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dehradun Stone Pelting case)
उत्तराखंडच्या डेहराडून रेल्वे स्थानकावर दोन गटांत तुफान राडा झाल्याचे निदर्शनास आले आहे. एक अल्पसंख्याक तरुणी बदायूंहून जेव्हा डेहराडूनला पोहोचली, तेव्हा तिचा हिंदू प्रियकर तिला घेण्यासाठी रेल्वेस्थानकात आला होता. दोघे रेल्वे स्थानकावर आल्याची बातमी परिसरात पसरताच दोन्ही समुदायातील लोक स्टेशनबाहेर जमा झाले आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर जातीय तणाव निर्माण होऊन दोन्ही गटांत दगडफेक झाली. ती मुलगी स्वतःहून  डेहराडूनला आल्याचा दावा करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या काही दुचाकींचे नुकसान झाले, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या एसएसपींनी सांगितले की, रेल्वे स्थानकाबाहेर तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी विकास वर्माला चौकशीसाठी नेले असता शहरातील पलटण बाजार आणि घंटाघर परिसरात तणावाचे वातावरण पसरले. वर्मा यांच्या अटकेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद केली आणि त्यांची तात्काळ सुटका आणि एसएसपी यांना हटवण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.

बजरंग दलाचे राज्य समन्वयक अनुज वालिया म्हणाले, 'विकास वर्मा यांची तात्काळ सुटका करून एसएसपीला हटवण्याची आमची मागणी होती. मात्र वर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पलटन बाजार परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे."
Powered By Sangraha 9.0