मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dehradun Love Jihad Case) उत्तराखंडच्या डेहराडून रेल्वे स्थानकावर दोन गटांत तुफान राडा झाल्याचे निदर्शनास आले आहे. एक हिंदू तरुणी बदायूंहून जेव्हा डेहराडूनला पोहोचली, तेव्हा तिचा मुस्लिम प्रियकर तिला घेण्यासाठी रेल्वेस्थानकात आला होता. हिंदू तरुणीचे नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तरुणीला आपल्या कह्यात घेतले.
मुस्लीम मुलगा बदायूंचा रहिवासी असून सेलाकोई येथील एका कारखान्यात काम करतो, असे सांगण्यात येते. त्याचा हिंदू तरुणीशी संपर्क सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला होता. बदायूंमधून मुलगी बेपत्ता होताच तिच्या कुटुंबीयांना ती डेहराडूनला आल्याचा संशय आला, त्यानंतर तिचे नातेवाईक येथे सक्रिय झाले.