शिवलिंग तोडून नाल्यात फेकणाऱ्याविरोधात हिंदू एकवटले

27 Sep 2024 19:35:24
 
Broke Shivlinga
 
शिमला : शिवलिंग असलेल्या एका छोट्या मंदिरात काही अज्ञात हैवानांनी शिवलिंग तोडल्याचे कृत्य केले. याप्रकरणी आता हिंदू संगठनांनी आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. ही घटना हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील नगरोटा बगवा येथील असून ही घटना २७ सप्टेंबर रोजी घडली आहे.
 
प्रसारमाध्यमानुसार, हिमाचल प्रदेश येथील कांगडातील बगवा येथे असलेल्या गाँधी मैदान नजीक भगवान शंकराचे छोटे मंदिर बांधले होते. त्यावेळी काही अज्ञातांनी शिवलिंगच उखडून काढल्याचा उन्माद केला. या कृत्याने आता हिंदू भडकले आहेत. एवढंच नाहीतर त्याचा काही भाग हा नाल्यात टाकून दिल्याची माहिती प्रसारमाध्यमाने दिली. याप्रकरणाने वादंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी हिदू संघटनांनी आरोपीचा शोध घ्या आणि त्याच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी केली.
 
 
 
यावेळी हिंदू संगठनांनी पोलीस प्रशानसनासमोर प्रदर्शन केले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तुटलेले शिवलिंग ताब्यात घेतले. यावेळी सीसीटीव्हीची तपासणी केली असता, शिवलिंग तोडणारी व्यक्ती कोण होती याचा तपास पोलिसांना करता आला नाही.
 
यावेळी व्यापारी आणि हिंदूंनी एकजुटता दाखवून याप्रकरणी प्रदर्शन सुरू ठेवले. तसेच यावेळी पोलिसांनी संबंधित रस्त्यावरून गेलेल्या गाड्यांचा तपास करणे सुरू केले. याप्रकरणात शिवलिंगासोबत वाईट कृत्य केलेली व्यक्ती अद्यापही पोलिसांच्या हाती आलेली नाही.
 
Powered By Sangraha 9.0