ढाका : बांगलादेशातील सरकार बदलल्यानंतर बांगलादेशात हिंदू (Hindu) नागरिक आणि हिंदू देवता सुरक्षित असल्याच्या घटना प्रसारमाध्यांनी दिल्या आहेत. तसेच बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे सरकार असल्यापासून हिंदूंवरील आत्याचारात वाढ झाली आहे. याआधी मैमेनसिंह जिल्ह्यातील गौरीपुर येथे २५ सप्टेंबर रोजी घडली आहे. बांगलादेशी समाजकंटक यासीन मियाने दुर्गामूर्तीच्या कारखान्यात जाऊन दुर्गामूर्तीची तोडफोड केली आहे. याप्रकरणी आता आरोपी यासीनला २६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या २० दिवसांपासून बांगलादेशातील मैमेनसिंह जिल्ह्यातील गौरपूर या शहरात दुर्गामूर्तीचे काम सुरू होते. त्यावेळी त्या यासीन नावाच्या समाजकंटकाने मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आसपास ठिकाणी काही हिंदू महिला होत्या त्यावेळी एका महिलेने घडलेला प्रकार पाहताच आरडाओरड केली होती. यावेळी हिंदू युवकांनी घटनास्थळी धाव घेत यासीनला अटक करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी आरोपी यासीनवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. सामाजात तणाव निर्माण केल्याचे कृत्य केले. येत्या ९ ऑक्टोंबर रोजी नवरात्रोत्सवानिमित्ताने दुर्गादेवीच्या पूजेसाठी मूर्तींचे रंगकाम सुरू असताना हा हल्ला केला आहे.