सेन्सेक्स ऑल टाईम हाईवर; दिवसभरात ६६६ अंकांची उसळी

26 Sep 2024 17:15:42
bombay stock exchange sensex


मुंबई :    मागील तीन दिवसात सलग भारतीय शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठले आहेत. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०ने आशियाई बाजारातील सकारात्मक रॅली दरम्यान ऑटो आणि मेटल स्टॉकमधील खरेदीमुळे नवा उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स ६६६.२५ अंकांनी किंवा ०.७८ टक्क्यांनी वाढून ८५,८३६.१२ वर बंद झाला आहे.

दरम्यान, निफ्टी ५० आज २११.९० अंकांनी वाढून २६,२१६.०५ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील टॉप ३० समभागांपैकी २८ समभाग वधारलेले आहेत. मारुती सुझुकीने जवळपास ५ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. टाटा मोटर्स, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह आणि टाटा स्टील या कंपन्यांचे समभागांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे, सेन्सेक्स इंडेक्समधील ३० समभागांपैकी फक्त दोन कंपन्यांचे म्हणजेच एल अँड टी आणि एनटीपीसी समभाग घसरले आहेत.

त्याचबरोबर, निफ्टी ५० मधील टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांचे शेअर्स ४.४८ टक्क्यांपर्यंत वाढले तर ओएनजीसी, लार्सन अँड टुब्रो, हीरो मोटोकॉर्प आणि एनटीपीसी हे नऊ समभाग 1.47 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. जागतिक बाजाराच्या हालचालींवर नजर टाकल्यास सोल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील एक्सचेंजेस लक्षणीय वाढीसह बंद झाल्याने आशियाई बाजारांत सकारात्मक व्यापार सत्र पाहायला मिळाले.



Powered By Sangraha 9.0