परदेशात अडकलेल्या भावाची सुटका आलिया कशी करणार? ‘जिगरा’चा ट्रेलर प्रदर्शित

26 Sep 2024 16:42:29

alia bhatt  
 
 
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट हिने आजवर विविधांगी भूमिका साकारत कायम तिच्या चाहत्यांना बुचकळ्यात पाडलं. ‘गंगुबाई काठीयावाडी’ चित्रपटातील भूमिकेमुळे राष्ट्रीय पुरस्कार पटकवणाऱ्या आलियाचा ‘जिगरा’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यात आलिया धमाकेदार अ‍ॅक्शन आणि स्टंट्स करताना दिसत आहे. आलिया भट्टबरोबर यात अभिनेता वेदांग रैनाही या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
 
‘जिगरा’च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच आलिया थोडी घाबरलेली दिसते. त्यात तिच्या भावाला परदेशी भूमीवर ड्रग्ज (अमली पदार्थ) जवळ सापडल्याने अटक करण्यात आली आहे, असं दाखवण्यात आलं आहे. ही बातमी समजल्यावर आलियाची भावाला भेटण्यासाठीची तळमळ दिसते. सुरुवातीला घाबरलेली आलिया भावाला वाचवण्यासाठी काय काय करते, हा प्रवास ट्रेलरमधून दिसतोय. ट्रेलरच्या मध्यावर आलियाचे जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स दिसून येतात.
 
तसेच, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही बहीण-भावाचं प्रेमळ नातं आल आहे. लहानपणापासून आलिया भावाचं करीत असलेलं रक्षण हे क्षण ट्रेलरमध्येही दिसतात. वासन बाला दिग्दर्शित हा चित्रपट सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0