मुंबई : संजय राऊतांना एका मानहानीच्या खटल्यात १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. दरम्यान, आता त्यांना या खटल्यात जामीन मंजूर झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा त्यांना मोठा दिलासा मानला जात आहे.
मेधा किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊतांनी कथित शौच्छालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी माझगाव कोर्टात राऊतांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
हे वाचलंत का? - कोर्टाच्या शिक्षेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
यानंतर संजय राऊतांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, आता त्यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. तसेच या निर्णयाच्याविरोधात वरच्या कोर्टात ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता संजय राऊत वरच्या कोर्टात दाद मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.