मुंबई : उबाठा गटाचे नेते संजय राऊतांना न्यायालयाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ते दोषी आढळले आहेत. माझगाव कोर्टाने हा निर्णय दिला.
संजय राऊतांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर कथित शौच्छालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी माझगाव कोर्टात संजय राऊतांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. यावर आता कोर्टाने निर्णय दिला असून यात संजय राऊतांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी संजय राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत.