जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींसाठी एकच शिक्षा 'एनकाउंटर'

26 Sep 2024 16:57:59

Sadhvi Prachi

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sadhvi Prachi)
"'थुंक जिहाद' आणि 'मूत्र जिहाद' यांसारख्या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा पुरेशी नाही. असे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा थेट एनकाउंटर केला पाहिजे.", असे म्हणत हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्राची यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा हिंदूंचा धर्म भ्रष्ट करण्याचा डाव असून यातील आरोपींच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला जावा, असेही त्यांनी म्हटले आहे. बागपत येथे त्या माध्यमांशी बोलत होत्या. 

हे वाचलंत का? :'त्या' पाकिस्तानी हिंदू स्थलांतरितांच्या संघर्षाला यश

वक्फ बोर्ड आणि जिहादी प्रवृत्तींचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, "लव्ह जिहादमध्ये श्रद्धाचे ३६ तुकडे करण्यात आले आणि लँड जिहादच्या माध्यमातून हिंदूंच्या भूमीवर कब्जा केला जात आहे. हिंदूंविरोधात हे सुनियोजित षडयंत्र आहे. सरकारने यावर कठोर कारवाई करावी. उत्तर प्रदेशात योगी सरकार जो निर्णय घेत आहे, ते खरच कौतुकास्पद आहे. वक्फ बोर्ड पूर्णपणे रद्द केले पाहिजे, कारण नेहरूंनी जेव्हा ते लागू केले तेव्हा त्यांनी कोणाचाही सल्ला घेतला नाही. भारतातील वक्फ बोर्डाने वेढलेली मालमत्ता ना नेहरू कुटुंबाची होती ना कोणत्याही नेत्याची. ती हिंदूंची होती. बांगलादेश किंवा पाकिस्तानमध्ये ज्या हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत त्यांना ही संपत्ती देण्यात यावी."

Powered By Sangraha 9.0