ठाणे : महाराष्ट्र सेवा संघाच्या 'साहित्य सम्राट ‘न. चिं. केळकर’ ग्रंथालया' तर्फे मुलुंड येथील पं. जवाहरलाल नेहरू मार्गावरील शंकर गोखले सभागृहात २७ व २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कै. लक्ष्मणराव महाबळ पितृस्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. खगोल महामंडळाचे सहसंस्थापक, पत्रकार, व्याख्याते दिलीप जोशी आणि सेवानिवृत्त मेजर मनीष नाईक हे या कार्यक्रमात व्याख्याते असणार आहेत. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्मरण आणि कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली या विषयांवर आधारित व्याख्यान या कार्यक्रमात होणार आहेत.