तुमच्या तीन पिढ्यांनाही कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही!

26 Sep 2024 18:44:36
 
Amit Shah
 
नवी दिल्ली : काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या तीन पिढ्यांनाही कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही, असा घणाघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी जम्मू – काश्मीरमधील प्रचारसभेस संबोधित करताना गुरुवारी केला.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे निवडणूक प्रचारसभेस संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल बाबा म्हणतात आम्ही कलम ३७० परत आणू. मात्र, आपल्याल या मंचावरून सांगायचे आहे की राहुल बाबा तुम्हीच काय, मात्र तुमच्या तीन पिढ्यांमध्येही कलम ३७० परत आणण्याची ताकद नाही, असा घणाघात त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरे राऊतांचा राजीनामा घेणार का? आशिष शेलारांचा सवाल
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये दगडफेक किंवा दहशतवादास थारा नाही. राहुलबाबा काल म्हणाले की, आम्ही जम्मू - काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ. मात्र, निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ, असे देशाच्या संसदेत मोदी सरकारने स्पष्ट केले आहे. ओमर अब्दुल्ला आणि राहुल बाबा म्हणतात की आम्ही काश्मीरमध्ये लोकशाही आणू, मात्र याच कुटुंबांनी जम्मू-काश्मीरला ७० वर्षे विभाजनकारी वातावरण निर्माण करून ठेवले आहे. त्याचवेळी मोदी सरकारच्या काळातच काश्मीरी नागरिकांना हक्क मिळाल्याचेही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी नमूद केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0