फलकावर 'गो बॅक हिंदू' लिहून मोदींना शिवीगाळ, अमेरिकेच्या हिंदू धर्मस्थळांची विटंबना

26 Sep 2024 16:15:52

 Hindu Go Back
 
वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी २५ सप्टेंबर रोजी सॅक्रामेंटो काउंटी, कॅलिफोर्निया येथे घडली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. मंदिराबाहेर एका फलकावर समाजकंटकांनी हिंदूविरोधात द्वेष पसरवणारा मथळा लिहिला आहे. त्या फलकावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणारे वाक्य नमूद केले गेले आहे. यामागे खलिस्तानी गटाचा मोठा हात असल्याचा संशय नाकारता येत नाही.
 
या हल्ल्याबाबतची माहिती ही बीएपीएस (BAPS) पब्लिक अफेयर्स या नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली. त्यांनी सांगितले की, न्यूयॉर्क येथील मंदिरांची विटंबना केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. कॅलिफोर्निया येथे हिंदू धर्मस्थळांची विटंबना केली. यावेळी त्या फलकावर हिंदूंविरोधात काही असभ्यतेच्या बाबी लिहिण्यात आल्या होत्या. गो बॅक हिंदू सारख्या घोषणा संबंधित फलकावर लिहिण्यात आल्याचे छायाचित्रात दिसत होते.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या व्हिडिओत फलकावर जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादी असल्याचे लिहिले. यावेळी अमेरिकेचे खासदार रे खन्ना यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, अमेरिकन हिंदू लोकांबाबतचा राग असणे हे भयानकपणाचे लक्षण आहे.ते नैतिकदृष्ट्या चुकीचे असून न्याय विभागाने याप्रकरणी गुन्ह्याची चौकशी करावी.
 
Powered By Sangraha 9.0