अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती

25 Sep 2024 15:07:29

ashutosh  
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि निर्माते आशुतोष गोवारीकर यांची दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे १५ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या चित्रपट महोत्सवाच्या संचालकपदी दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांनी निवड करण्यात आली आहे.
 
मानद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना आशुतोष गोवारीकर म्हणाले की, "अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदाची जबाबदारी मला दिली असून तो माझा मी बहुमान समजतो. तसेच, सर्व सृजनशील दिग्दर्शकांच्या जोडीने एक अत्यंत चांगली कलात्मक प्रक्रिया यानिमित्ताने घडवता येईल याचा मला विशेष आनंद आहे".
 
आशुतोष यांनी लगान, स्वदेस, जोधा अकबर असे अनेक उत्तम चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. याशिवाय काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या काला पानी या वेब सीरीजमध्ये त्यांनी अभिनय देखील केला होता.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0