दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रंगणार ‘अध्यात्मरंग महोत्सव’

25 Sep 2024 15:07:45

event 
 
मुंबई : दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘अध्यात्मरंग महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात सायंकाळी ५:३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवात डॉ. सुचेता परांजपे यांचे ‘ऋग्वेदाचा परिचय’, ‘उपनिषदे कथांमधून तत्वज्ञान’ या विषयांवरील व्याख्यान होणार आहे. कै.विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान निर्मित संगीत नाटकातील ‘भक्तीगीत गंगा’ कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना शुभदा दादरकर यांची आहे. धवल भागवत, श्रीया सोंडूर, संगीता चितळे यांचा यात सहभाग असून केदार भागवत आणि सुहास चितळे त्यांना साथ देणार आहेत. प्रज्ञा लेले या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0