मुंबई : ‘सवाई गंधर्व’ या संस्थेतर्फे ‘अभ्यंग स्वर’ ही सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. दीपावलीच्या निमित्ताने या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 3 नोव्हेंबर रोजी बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती आकाश भडसावळे यांची आहे. दिवाळीची सुरुवात आनंददायी आणि सुरेल व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow वर उपलब्ध आहेत.