लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ (Yogi Adityanath) यांनी खाद्यपदार्थात होणाऱ्या भेसळीविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. अनेकदा खाद्यपदार्थात भेसळ करून अन्नपदार्थ खाऊ घातले गेले. पुन्हा एकदा हाच प्रकार होऊ नये यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील हॉटेल आणि ढाबा येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वारंवार चौकशी व्हावी असा आदेश दिला.
याआधी उत्तर प्रदेशात अनेकदा खाद्यपदार्थात लघवीचे मिश्रण करण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात अशाच काही घटना घडत असल्याचे चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर योगींनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी घडलेल्या प्रकरणाविरोधात नेमकं काय करता येईल यावर भाष्य केले. तसेच योगी म्हणाले की, उत्तर प्रदेशात सध्या जे सुरू आहे त्याविरोधात कडक कारवाई व्हावी हा त्यामागणी उद्देश नसून असे कृत्य पुन्हा कधीही होऊ नये असा उद्देश असल्याचे ते म्हणाले आहेत.
ढाबा आणि रेस्टॉरंट येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलीसांनी पडताळणी करण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले. यामुळे खाद्यपदार्थात होणारी भेसळ कमी होईल. यामुळे ग्राहकांची सुरक्षा आणि विश्वासार्हता निर्माण होण्याच्या उद्देशाने योगी आदित्यानाथ यांनी हा निर्णय घेतला. तसेच रेस्टॉरंटचे मालक आणि व्यवस्थापकांना त्यांची नावे आणि पत्ता ठळकपणे नमूद करावा, असे सांगण्यात आले होते.
यामुळे हॉटेल आणि चालक यांच्या कामाच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. पुन्हा एकदा खाद्यपदार्थात भेसळ आढळल्यास त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करता येईल, असे सांगण्यात आले आहे.