कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार

25 Sep 2024 16:25:02
 
Kamala Harris Firing
 
 
वॉशिंगटन डी. सी. : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरोधात असलेल्या कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार 
(Kamala Harris Firing) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेत राजकीय रणधुमाळी सुरू असून आगामी ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकन नागरिक पुढील राष्ट्रध्यक्षांसाठी मतदान करतील. मात्र या मतदानाआधी गोळीबाराचे सत्र सुरुच आहे. याआधी अमेरिकेचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही गोळीबार करण्यात आला होता. यानंतर आता कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार करण्यात आल्याने अमेरिकेच्या राजकारणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.
 
काही दिवसांआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनार्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. आता त्यानंतर ॲरिझोना येथे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे विदेशातील राजकारण हि एक चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे.
 
याप्रकरणात आता पोलिसांनी दुजोरा दिला असून मध्यरात्रीनंतर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती काही माध्यमांनी दिली आहे. एका वृत्तामधून माहिती देण्यात आली की, जेव्हा कार्यालयात गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी कोणीही उपस्थित नव्हते. आता याचसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेनंतर तपास यंत्रणा घटनास्थळी जाऊन घटनेचा तपास करत आहेत. तसेच याप्रकरणात आता सुरक्षेसाठी पाऊले उचलली जात आहेत. याप्रकरणी पोलीस आता घटनेचा तपास करत आहेत. यासाठी आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पावले उचलली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
जेव्हा गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. कमला हॅरिस यांच्या प्रचारकार्यालयाच्या खिडक्यांमधून याआधी एकदा गोळीबार झाला होता. तर आता दुसऱ्यांदा गोळीबार झाला होता. याप्रकरणात अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नाही. दरम्यान या घडलेल्या घटनेचा पोलीस तपास करत असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0