मुंबई : मराठी बिग बॉसचे पाचवे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहेत. यंदाचं सीझन १०० नाही तर ७० दिवसांत संपणार आहे. या शोचा ग्रँड फिनाले जवळ येत चालला असून आता शोचा विजेता कोण असणार, याबाबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर्वाच्या सुरुवातीपासून निक्की तांबोळीलाच विजेती घोषित करा असे प्रेक्षकही म्हणत होते. परंतु, आता एक फोटो व्हायरल होत असून त्यात थेट विजेता कोण असणार हे नाव समोर येत आहे.
आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तमदादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोवा, आर्या जाधव, छोटा पुढारी घनश्याम दरोडे, वैभव चव्हाण, वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुले आणि अरबाज पटेल हे स्पर्धक बाहेर गेले आहेत. सध्या घरात वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार आणि अभिजीत सावंत हे सदस्य आहेत. या आठ सदस्यांपैकी विजेता कोण असणार, याबाबतचा एक फोटो चर्चेत आहे.
सध्या घरात असलेल्या आठ सदस्यांपैकी वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार यांचे एलिमिनेशन होईल. तर निक्की तांबोळी चौथी रनर-अप असेल, जान्हवी तिसरी रनर-अप असेल, सूरज तिसऱ्या क्रमांकावर असेल. अंकिता व अभिजीत यापैकी एक विजेता असेल. आणि तो विजेता सदस्य अभिजीत सावंत असणार असे फोटोतून दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोत दिसून येत आहे की, ६३ व्या दिवशी डबल एविक्शन होईल, त्यात वर्षा उसगांवकर व पंढरीनाथ कांबळे बाहेर जातील. त्यानंतर ६८ व्या दिवशी धनंजय पोवार एलिमिनेट होईल. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर व अभिजीत सावंत हे टॉप पाच सदस्य असतील. त्यापैकी अभिजीत विजेता ठरेल.
दरम्यान, बिग बॉस मराठीचा पाचवा पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. पण त्यापूर्वी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्याने विजेता आधीच ठरल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.