मुंबई : ‘समाजाचे आपण देणे लागतो’ या भूमिकेतून जगणाऱ्या रत्नांचा ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ देऊन सन्मान करण्यासाठी अद्वैत थिएटर या नाट्यसंस्थेचे निर्माते राहुल भंडारे ह्यांनी ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
अद्वैत थिएटर संस्था १८ वर्षे रंगभूमीवर सक्रीय कार्यरत असून आजवर दर्जेदार २६ नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. अद्वैत थिएटर संस्थेकडून समाजातील प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रात प्रगती करत असताना सोबत सामाजिक बांधिलकी जपत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्याचे आयोजले आहे. हा सन्मान अद्वैत थिएटर तर्फे करण्यात येणार आहे.
या सन्मानाचे सत्कारमूर्ती आहेत, मा.श्री सिद्धार्थ टी. कांबळे (उपाध्यक्ष-मुंबई जिल्हा बँक-जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस,व समाजसेवक) सामाजिक, राजकीय आणि सहकार विभागात विशेष कामगिरी केली आहे. कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आणि रसिकांचे निखळ मनोरंजन करणारे अभिनेता भाऊ कदम या दोन रत्नांना ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
हा सत्कार समारंभ बुधवार २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट, मुंबई येथे संपन्न होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. डॉ. भीमराव आंबेडकर, मा.पूज्य महाथेरो राहुल बोधी व ज्येष्ठ विचारवंत व लेखक मा. ज.वि.पवार ह्यांच्या हस्ते सत्कारमूर्तीचा सन्मान होणार आहे. अनिरुद्ध वनकर ह्यांचा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे.