अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सुनावणी! कोर्टाने पोलीसांना झापले

25 Sep 2024 13:22:32
 
High court
 
मुंबई : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अक्षय शिंदेंच्या वडिलांनी या एन्काऊंटरच्या विरोधात याचिका दाखल केली होती. यावर आता सुनावणी सुरु असून न्यायलयाने पोलिसांना अनेक सवाल केले आहेत.
 
पोलिसांनी सोमवारी सायंकाळी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. परंतू, यावरून सध्या अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विधानसभा निवडणूका असल्याने आपल्या मुलाची हत्या केली असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या आईवडीलांनी केला आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली.
 
हे वाचलंत का? -  'वापरा आणि फेका' यात उद्धव ठाकरेंची पीएचडी! आमदार नितेश राणेंची टीका
 
दरम्यान, आता न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने पोलिसांना अनेक सवाल केले आहे. आरोपीला थांबवता आलं असतं पण पोलिसांनी गोळी का चालवली? असा सवाल कोर्टाने केलेला आहे. तसेच आरोपीच्या डोक्यातच गोळी का मारली? सामान्य माणूस प्रशिक्षण घेतल्याशिवाय बंदूक चालवू शकत नाही. कमकुवत माणूस पिस्तूल लोड करू शकत नाही कारण त्याला ताकद लागते. तुम्ही कधी पिस्तूल वापरले आहे का? मी ते १०० वेळा वापरले आहे म्हणून मला हे माहित आहे, असा सवालही कोर्टाने सरकारी वकिलाला केला आहे.
 
तसेच एन्काऊंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. सरकारी वकिलाने सांगितलेला घटनाक्रम हा न समजण्यासारखा आहे. या प्रकरणात गडबड वाटल्यास योग्य ती पावलं उचलावी लागतील, असेही कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने पोलिसांना केलेल्या प्रश्नांमुळे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0