'तिरंगा रॅली'च्या नावाखाली जिहाद्यांचा उन्माद!

25 Sep 2024 12:47:56

AIMIM Rally Update

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (AIMIM Rally Update)
इस्लामिक कट्टरतावाद्यांनी मुंबईत येऊन 'सर तन से जुदा'च्या घोषणा देत वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला आहे. कट्टरतावाद्यांचा हा जमाव भाजप नेते नितीश राणे आणि महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात मुंबईच्या दिशेने आला आहे. या तथाकथीत 'तिरंगा रॅली'चे नेतृत्व एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील करत आहेत. यादरम्यान काही जिहादी मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे दिसून आले. त्याला उत्तर म्हणून पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

हे वाचलंत का? : "जेव्हा जेव्हा गुन्हेगारांना शिक्षा झाली तेव्हा काँग्रेसला..."; भाजपचा घणाघात

या रॅलीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात हजारो वाहनांवर हिरवे झेंडे फडकवल्याचे दिसत असून 'नारा-ए-तकबीर' व 'सर तन से जुदा'च्या घोषणा हे कट्टरतावादी देताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत एकेका गाडीत १० जण बसून मुंबईच्या दिशेने येत असल्याचे दिसत आहे. इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रातील मुस्लिमांना ‘चलो मुंबई’चा नारा दिल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. हा जमाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती.


आंदोलनादरम्यान ठाण्यातील आनंद नगर जकात ब्लॉकजवळ एमआयएम कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. रॅलीदरम्यान मुंबईतील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे जिल्हा अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने त्यांची विनंती मान्य केल्यानंतर रॅली पुन्हा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वळवण्यात आली.
Powered By Sangraha 9.0