पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा

24 Sep 2024 18:59:50
pm narendra modi on ukraine tour


नवी दिल्ली : 
न्यूयॉर्कमध्ये आयोजित समिट ऑफ द फ्युचर नामक परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेऊन द्विपक्षीय पातळीवर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या युक्रेन दौऱ्याची आठवण काढली आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध निरंतर दृढ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या चर्चेदरम्यान, युक्रेनमधील सद्यस्थिती तसेच शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढील योजना निश्चित करण्याबाबत देखील विचारविनिमय झाला.
 

 

राजनैतिक संबंध तसेच चर्चेच्या आणि सर्व हितसंबंधीयांच्या सहभागाच्या माध्यमातून संघर्षाच्या स्थितीवर शांततामय तोडगा काढण्याच्या बाबतीत भारताच्या स्पष्ट, सातत्यपूर्ण आणि संरचनात्मक दृष्टिकोनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. सदर विवादाची शांततेच्या मार्गाने सोडवणूक करण्यासाठी भारताला त्याच्या अधिकारात शक्य असलेला सर्व प्रकारचा पाठींबा देण्यासाठी भारत सज्ज आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. तीन महिन्यांच्या कालावधीत झालेली या दोन्ही नेत्यांची ही तिसरी भेट होती. एकमेकांच्या सतत संपर्कात राहण्याबाबत दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली.




Powered By Sangraha 9.0