नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने जगभरातील अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या हिज्ब-उत-तहरीर या दहशतवादी संघटनेवर मोठी कारवाई केली. दहशतवादी कट प्रकरणी एनआयएने मंगळवारी तामिळनाडूमध्ये ११ ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
एनआयएने चेन्नई, तांबरम आणि कन्याकुमारी जिल्ह्यात ११ जणांतच्या घरावर छापेमारी केली. त्यामध्ये डिजिटल उपकरणे, बेहिशेबी रोकड आणि हिजबुत-तहरीरशी संबंधित साहित्यासह विविध गुन्हेगारी साहित्य जप्त केले गेले. हिजबुत-तहरीर या प्रतिबंधित संघटनेत लोकांची भरती केल्याचा गुन्हा चेन्नई पोलीसांनी दाखल केला आहे. या संघटनेवर लोकांचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप आहे. ही संस्था तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना देशविरोधी कारवाया करायला लावण्याचे काम करते.
ही संघटना तरुणांना जिहादसाठी तयार करते. त्याचबरोबर दहशतवाद्यांना जैविक शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षणही देते. यापूर्वी मध्य प्रदेशात हिज्ब-उत-तहरीरशी संबंधित १६ जणांना अटक करण्यात आली होती. तरुणांना कायदेशीररित्या स्थापित लोकशाही सरकारं उद्धवस्त करण्यासाठी या संघटनेकडून उत्तेजन देण्यात असे.