पश्चिम रेल्वेवर "या" तारखेला असेल मेगाब्लॉक

24 Sep 2024 15:11:49

megablock
 
 
 
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेची कामे प्रगतिपथावर आहेत. याच पार्श्वभूमीवर, मंगळवार, दि. २४ सप्टेंबर आणि बुधवार, दि. २५ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री साडेसहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे बांधकाम सुलभ करण्यासाठी, मंगळवार, बुधवारच्या मध्यरात्री पाचव्या मार्गावर आणि अप फास्ट मार्गावर ११ ते पहाटे ५:३० वाजेपर्यंत साडेसहा तासांचा मोठा ब्लॉक घेतला जाईल. ब्लॉकदरम्यान, सर्व अप फास्ट मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी यांदरम्यान रात्री ११:३० ते पहाटे ३:३० या वेळेत अप स्लो मार्गावर धावतील. सर्व अप आणि डाऊन मेल-एक्स्प्रेस गाड्या अंधेरी ते बोरिवलीदरम्यान अनुक्रमे ११ ते ५:३० या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावर धावतील. या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय गाड्या प्रभावित होतील. 

Powered By Sangraha 9.0