हिजबुल्लाहचा कर्दनकाळ; 'तुमचा वापर मानवी ढाल...'; इस्त्रायल पंतप्रधानांचे लेबनीज नागरिकांना आवाहन

    24-Sep-2024
Total Views |
israel-defence-force-missile-strike-hezbollah-hideouts


नवी दिल्ली :    इस्लामिक दहशतवादी संघटना हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचे पेजर फोडल्यानंतर इस्रायलने आता थेट हल्लेसुरू केले आहेत. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या स्थानांना लक्ष्य केले असून त्यांची शस्त्रे नष्ट केली आहेत. इस्रायलच्या या हल्ल्यात आतापर्यंत ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलकडून हिजबुल्लाच्या नायनाटाकरिता जोरदार प्रयत्न सुरू असून थेट हल्ले सुरू केले आहेत.




दरम्यान, इस्त्रायलने दि. २३ सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये पेजरमध्ये स्फोट घडवून आणले. त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. इस्त्रायलने लेबनॉनमधील १६००हून अधिक जणांना लक्ष्य केले असून हे सर्व लक्ष्य हिजबुल्लाचे सुरक्षित आश्रयस्थान होते. इस्त्रायलकडून करण्यात आलेले हल्ले हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्र ठिकाणावर होते. हवाईहल्ल्यात लेबनॉनमधून पळून गेलेले लोकदेखील यात मारले गेल्याची शक्यता आहे.

इस्त्रायली हल्ल्यांमध्ये ५५८ हून अधिक लोक मारले गेले तर १६०० हून अधिक लोक जखमी झाल्याचे लेबनॉनने म्हटले आहे. हिजबुल्लाहवरील इस्त्रायली हल्ल्यांमुळे मोठ्या संख्येने लोकांनी हिजबुल्लाहचे तळ सोडले. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक वाहने घेऊन रस्त्यावर धावताना दिसले. या संघर्षानंतर इस्त्रायल पंतप्रधान नेतान्याहू यांनी लेबनीज नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

नेतान्याहू पुढे म्हणाले, इस्रायलचे युद्ध तुमच्याशी नसून हिजबुल्लासोबत आहे. बऱ्याच काळापासून, हिजबुल्लाह तुमचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. आयडीएफने संकटाच्या मार्गातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, हा इशारा गांभीर्याने घ्या. हिजबुल्लाहच्या पायी तुमचे जीवन आणि तुमच्या प्रियजनांचे जीवन धोक्यात येऊ देऊ नका. एकदा आमचे ऑपरेशन पूर्ण झाले की तुम्ही तुमच्या घरी सुरक्षितपणे परत येऊ शकता, असे आवाहन करत हिजबुल्लाहाला इशारा दिला आहे.