मुंबई : अक्षय शिंदेसारख्या गुन्हेगारांना जनतेत सोडलं पाहिजे आणि जनतेने त्यांना तुडवून मारायला हवं, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
हे वाचलंत का? - हात बांधलेले असताना आरोपीने गोळीबार कसा केला? सुप्रिया सुळेंचा सवाल
उदयनराजे भोसले म्हणाले की, "सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशी मला काही देणंघेणं नाही. पण सत्ताधारी किंवा विरोधकांच्या कुटुंबियासोबत अशी घटना झाली असती तर काय केलं असतं. ते बोलले असते का? मग त्या मुलींच्या कुटुंबियांना ज्या गोष्टीला सामोरं जावं लागतं, त्यांच्याजागी मी स्वत:ला ठेवून बोलत असतो. आरोपीला गोळ्या घालून मारणं फार सहज झालं. अशा लोकांना जनतेत सोडलं पाहिजे आणि जनतेने त्यांना तुडवून मारायला हवं," असे ते म्हणाले.