स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा 'ऑस्कर २०२५'मध्ये प्रवेश
24-Sep-2024
Total Views |
मुंबई : विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट ऑस्कर २०२५ साठी भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची जबाबदारी रणदीप हुड्डा यांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. सावरकरांचे संपूर्ण जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा हा चित्रपट ऑस्करला पोहोचल्यामुळे चित्रपटसृष्टीतून टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी सोशल मिडियावर एका पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी सांगितली. आपला आनंद व्यक्त करताना सिंह म्हणाले की, " 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या आमच्या चित्रपटाची निवड ऑस्करसाठी केल्याबद्दल फिल्म फेडरेशनचे मनापासून आभार".
दरम्यान, किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज'हा चित्रपट देखील ऑस्कर २०२५ साठी भारताकडून पाठवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट देखील ऑस्करच्या शर्यतीत पोहोटल्यामुले भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.