सावरकर विचार मंच तर्फे ‘सावरकर विचार दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन

24 Sep 2024 17:26:38


savarkar vichar darshan 

 मुंबई : सावरकर विचार मंच, नवी मुंबईतर्फे ‘सावरकर विचार दर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार १ ऑक्टोबर रोजी वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी ७:३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अभिनेते आणि सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे या कार्यकमात प्रमुख व्याख्याते असणार आहेत. आमदार गणेशजी नाईक, संस्कार भारती कोकण प्रांताचे संघटनमंत्री उदयजी शेवडे, स्वातंत्रवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. संस्कार भारती, नवी मुंबई जिल्हा आणि विवेक व्यासपीठ, मुंबई या सहकारी संस्थांचे या कार्यक्रमाला सहाय्य लाभले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिक संपर्कासाठी ९९३०४१०००१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Powered By Sangraha 9.0