मुंबई : बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. मात्र, यावर विरोधकांनी संशय उपस्थित केल्यामुळे चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "बदलापूरचा हरामखोर नराधम ठार झाला. त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे, अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात. किती हा दुटप्पीपणा? आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करत असेल तर काय त्याची आरती करायची का? बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का आलाय? की ते नुसते राजकारण करणार?" असे सवाल त्यांनी केले आहेत.
अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर सध्या राजकारण चांगलंय तापलं आहे. या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.