'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडिज'ची ऑस्कर एन्ट्री होताच रवी किशन भावूक

23 Sep 2024 18:47:49
 
lapata ladies
 
 
 
मुंबई : प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारांची नामांकन यादी आज जाहिर करण्यात आली. या यादीत भारताच्या शिरपेचात किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ या चित्रपटाने मानाचा तुरा रोवला असून या चित्रपटाने ‘ऑस्कर २०२५’ मध्ये अधिकृत प्रवेश मिळवला आहे. ऑस्करचे नामांकन मिळाल्याने चित्रपटाची संपूर्ण टीम खूश झाली आहे. अशातच सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत भाव खाऊन गेलेला अभिनेते रवी किशनने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
 
'लापता लेडीज' या चित्रपटात अभिनेते रवी किशन यांनी श्याम मनोहर या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. नामांकन मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना रवी म्हणाले की, "मला खूप आनंद झालाय. मला खरंतर विश्वास बसत नाहीय. माझ्या ३४ वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये लापता लेडीज हा माझा पहिला चित्रपट आहे जो ऑस्करमध्ये एन्ट्री घेतोय."
 
 
 
पुढे रवी म्हणाले की, "मी आमिर खान आणि सिनेमाची दिग्दर्शक किरण रावचे आभार मानतो. आमच्या टीमच्या अथक मेहनतीचं हे फळ आहे. हा सिनेमा आता भारताचं प्रतिनिधित्व करतोय. याशिवाय भारतातील ८०% ग्रामीण भाग कशाप्रकारे प्रगती करतोय हे संपूर्ण जग बघेल. मुलींना स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो, याचं वास्तववादी चित्रण या सिनेमात दिसतं. सिनेमाच्या या गोष्टीने मला खूप प्रभावित केलंय." अशाप्रकारे रवी किशन यांनी त्यांचा आनंद व्यक्त केलाय. भारताचं प्रतिनिधित्व करणारा 'लापता लेडीज' ऑस्करच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
 
 
Powered By Sangraha 9.0