नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड शिखर परिषदेकरिता अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञआन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत गोलमेजमध्ये सहभाग घेतला. अमेरिकेतील बड्या आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत आयोजित गोलमेजमध्य सहभाग घेत भारतातील तत्रज्ञान विकास वाढीच्या क्षमतेवर भर दिला आहे.
दरम्यान, देशातील विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासोबतच एआय, क्वाटंम कंप्युटिंग आणि सेमीकंडक्टर सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या टॉप १५ अमेरिकन कंपन्यांचे सीईओ या बैठकीत सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लोटे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. कंपन्यांना सहकार्य आणि नाविन्यपूर्णतेच्या दृष्टीने भारताच्या विकासास सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी प्रोत्साहित केले.
न्यूयॉर्कमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंसोबत अर्थपूर्ण गोलमेजमध्ये भाग घेत एआय, 'क्वांटम कंप्युटिंग' आणि 'सेमीकंडक्टर' सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या आघाडीच्या यूएस कंपन्यांचे सीईओंसोबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.