कोल्हापूर - चंदगडमधून अजस्त्र 'किंग कोब्रा' सापाचा बचाव

23 Sep 2024 16:27:18
king cobra chandgad


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधून साधारण १० फूटांपेक्षा मोठ्या किंग कोब्रा सापाचा रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी बचाव केला (king cobra chandgad). तालुक्यातील कळसगादे गावातून या सापाचा बचाव करण्यात आला (king cobra chandgad). मानवी वस्तीनजीक हा साप असल्याने वन विभागाने त्याचा बचाव करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. (king cobra chandgad)
 
 
किंग कोब्रा' सापाला 'नागराज' असे म्हटले जाते. दोडामार्ग तालुक्यात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणतात. हा साप विषारी असून तो लांबीने साधारण २० फूटांपेक्षा अधिक वाढतो. कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये हा साप प्रामुख्याने आढळतो. पश्चिम घाटामधील 'किंग कोब्रा'च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग आणि चंदगड तालुका आहे. या तालुक्यांमधून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत. हा साप मोठा असल्याने त्याला मारून टाकले जाते. त्यामुळे सहजा त्याला जीवदान दिल्याच्या घटना घडत नाहीत. अशा परिस्थितीत रविवारी कळसगादे गावामधून किंग कोब्रा सापाचा बचाव करण्यात आला. हा साप मानवी वस्तीनजीक असल्याने आणि तो कात काढण्याच्या परिस्थितीत असल्याने त्याचा बचाव करुन आम्ही त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.

सापाला वाचवण्याची कामगिरी ही वन विभागाच्या आरआरटीचे पथक आणि हत्ती हकारा गटाच्या मदतीने करण्यात आली. प्रदीप सुतार, वनपाल जी.आर.डिसूझा, बी.आर.भांडकोळी, एस.जे.नागवेकर, वनरक्षक प्रकाश शिंदे, के.जी.कातखडे यांनी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0