आता येणार बड्या कंपनीचा IPO! जाणून घ्या सविस्तर

23 Sep 2024 14:21:01
ipo coming soon market


मुंबई :   
  द लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालवणाऱ्या श्लोस बेंगलोर लिमिटेडने आयपीओ जारी केला आहे. लीला हॉटेल कंपनीला आयपीआच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. श्लोस बेंगलोर लिमिटेडने ३ हजार कोटी किमतीच्या इक्विटी शेअर्सचा नवा इश्यू तर २ हजार कोटी किमतीच्या शेअर्स ऑफर फॉर सेल(ओएफएस)चा समावेश आहे.
 
 


दरम्यान, लीला हॉटेलची मूळ कंपनी श्लोस बेंगलोर लिमिटेडने सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)कडे ड्राफ्ट पेपर दाखल केले असून लवकरच कंपनी आयपीओ आणणार आहे. द लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालवणाऱ्या श्लोस बेंगलोर लिमिटेडने आयपीओसाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत.

श्लोस बेंगलोर लिमिटेडचा आयपीओ हा हॉटेल क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा आयपीओ मानला जातो. तसेच, कंपनी ५ हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. मागील काळात अनेक कंपन्यांचे आयपीओज बाजारात दाखल झाले. या आयपीओजना गुंवतणूकदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाले.


६०० कोटी रुपये उभारण्याचा विचार

कंपनी आयपीओ पूर्व नियोजनाच्या टप्प्यात ६०० कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास, ताज्या इश्यूचा आकार कमी केला जाऊ शकतो ज्यामुळे एकूण वाढलेली रक्कम बदलली जाऊ शकते.



Powered By Sangraha 9.0