भारतात प्रथमच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या प्रतितोळा भाव किती?

23 Sep 2024 13:09:44
gold rate in india


मुंबई :   
सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ दिसून आली आहे. सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती वाढीने सुरू झाल्या असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स)वर सोन्याचा ऑक्टोबरचा बेंचमार्क करार १६५ रुपयांच्या वाढीसह ७४,२०५ रुपयांवर उघडला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

दरम्यान, सोन्याचा भाव प्रति तोळा ७४,३०० रुपयांच्या आसपास तर चांदीचे दर प्रतिकिलो ९० हजारांच्या आसपास व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात वाढ तर चांदीच्या किंमतीत घट होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांत सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली असून गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ६९,००० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५,९२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

मुंबईत सोन्याचा दर ७५,९४७ रुपये प्रतितोळा असून दि. २२ सप्टेंबर रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७५,१४७ रुपये इतकी होती. तसेच, मागील आठवड्यात १७ सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव प्रतितोळा ७४,३४० रुपये इतका होता. यावेळी सोने दराचा उच्चांक ७४,३०६ रुपये तर नीचांक ७४,२०५ रुपयांवर पोहोचला. सोन्याच्या फ्युचर्स किमतीने ७४,४७१ रुपये या वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली होती.



Powered By Sangraha 9.0