ई-श्रम कार्ड आणि श्रमिकांसंदर्भात महत्वाची अपडेट्स

    23-Sep-2024
Total Views |
epfo-and-e-labour-data-will-be-linked
 
 
मुंबई :      भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) डेटा आणि ई-श्रम पोर्टल डेटा एकत्रित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय कामगार मंत्रालयाने घेतला आहे. यानिर्णयामुळे ईपीएफओ आणि ई-श्रम डेटा जोडला जाईल व असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर, ई-श्रम पोर्टलमध्ये असंघटित क्षेत्रातील आणखी २० कोटी कामगारांचा समावेश करून डेटा प्रक्रिया वाढविण्याचा केंद्रीय कामगार मंत्रालयाचा प्रयत्न आहे.



दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्रालय ईपीएफओ डेटा आणि ई-श्रम पोर्टल डेटा एकत्रित करण्यासाठी सज्ज असून अधिकाऱ्याने बिझनेस स्टँडर्डला सांगितले की, देशातील कर्मचाऱ्यांच्या औपचारिकतेच्या ट्रेंडचे मोजमाप करणे आणि त्याचे मूल्यांकन करणे मंत्रालयाचा उद्दिष्ट आहे. डेटाच्या एकत्रीकरणामुळे असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांच्या परस्पर हालचालींचा वास्तविक-वेळेवर मागोवा घेण्यात मदत होईल,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या निर्णयाच्या मदतीने कामगारांच्या कल्याणासाठी लक्ष्यित कल्याणकारी योजना करता येतील. सद्यस्थितीस कामगार मंत्रालय ३० कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या ई-श्रमचा मजबूत डेटा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांशी जोडत आहे. सामाजिक सुरक्षा उपायांमध्ये प्रवेश करण्यासाठी एकल विंडो किंवा वन स्टॉप सोल्यूशन म्हणून विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.