आयफोन स्वस्त झाले तरीही भारतात महाग काय आहे कारण?

23 Sep 2024 16:55:30
apple-iphone-becomes-expensive-in-india
 

मुंबई :     तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी अमेरिकन कंपनी अॅपलने आयफोन नुकताच iPhone 16 सीरिज भारतात लाँच केली. त्यानंतर आता देशात आयफोनची किंमत महाग असल्याचे समोर आले आहे. भारतात किंमती घसरल्यानंतरही जीएसटीमुळे आयफोनच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. भारतात प्रथमच प्रो आणि प्रो मॅक्ससह संपूर्ण iPhone 16 मालिका एकत्र करणार आहे.




दरम्यान, आयफोन कंपनीची मालकीची भारतात फक्त दोन स्टोअर्स आहेत. पण अमेरिकेसारख्या बाजारपेठेत ९५ टक्के विक्री टेलिकॉम कंपन्यांद्वारे होते यात फोनसह त्यांची सेवादेखील देतात. परिणामी, चीन व्यतिरिक्त कंपनी भारतात आयफोन निर्मिती करीत असून आयफोनच्या किमतीत घट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, भारतात महागड्या मॉडेल्सच्या किरकोळ किमती कमी केल्या असल्या तरी हे फोन अजूनही जगातील अनेक देशांपेक्षा महाग आहेत.

अमेरिका, संयुक्त अरब अमिराती (UAE), मलेशिया आणि थायलंड यांसारख्या देशांपेक्षा भारतात आयफोनची किंमत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. याचे मुख्य कारण भारतात मोबाईल फोन्सवर सर्वाधिक कर जीएसटी आकारला जात आहे. यामुळे जीएसटी करामुळे आयफोन्सची किंमत वधारलेली पाहायला मिळत आहे. परिणामी, देशांतर्गत उत्पादन होत असले तरी जीएसटीमुळे आयफोनच्या किमतीत वाढ होताना दिसून येते.



Powered By Sangraha 9.0