मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Tirupati Controversy SIT) आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये प्राण्याच्या चरबीयुक्त तुपाचा वापर केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदू सेनेचे प्रमुख सुरजित सिंह यादव यांनी दिलेल्या याचिकेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीची स्थापना करावी, अशी मागणी केली आहे.
मंदिराच्या शुद्धीकरणासाठी 'शांती हवन'
तिरुमला तिरुपती देवस्थानमने म्हटले आहे की भाविकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आणि मंदिर शुद्ध करण्यासाठी सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी 'शांती हवन' आयोजित करण्यात येणार होते.
तिरुपतीमध्ये बनवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये योग्य तूप वापरले जाईल याची खात्री करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमने स्वतःची प्रयोगशाळा देखील स्थापन करण्याबाबत सांगितले आहे. तिरुपतीमध्ये सध्या तज्ज्ञांच्या टीमला पाचारण करण्यात आले असून ते तुपाचे नमुने तपासत आहेत.