Tirupati Controversy : उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे कठोर पाऊल; घेतला 'हा' निर्णय

23 Sep 2024 16:04:57

Pawan Kalyan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pawan Kalyan)
आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर होत नुकतेच उघडकीस आले. त्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी कठोर पाऊल उचलले आहे. ११ दिवसीय तपश्चर्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुमलाच्या पावित्र्याचा, अध्यापनाचा आणि धार्मिक कर्तव्याचा धिक्कार करणाऱ्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या वागण्याने हिंदूंचे मन दुखावले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे वाचलंत का? :  केंद्रीय नेतृत्वाखाली भारत रामराज्याकडे वाटचाल करतोय

पवन कल्याण यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, मला क्षमा कर प्रभु. अत्यंत पवित्र मानला जाणाऱ्या तिरुमला लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी असल्याचे समजल्याने मी अस्वस्थ झालो आहे. क्रूर अंतःकरण असलेलेच असे पाप करतात. हे पाप सुरुवातीला न ओळखणे म्हणजे हिंदू जातीवर कलंक लावण्यासारखे आहे.

रविवारी २२ सप्टेंबर रोजी श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर नंबूर, गुंटूर येथे पवन कल्याण आधी दीक्षा घेतील. त्यानंतर ११ दिवसांनी तिरुमला श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारने केलेल्या कथित पापांचे प्रायश्चित करण्यासाठी त्यांनी आराध्याला विधी शुद्धीकरण करण्याची शक्ती देण्यासाठी प्रार्थना केली. तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कर्मचारी आणि मंडळाचे सदस्य या कथित अनियमिततेबद्दल अनभिज्ञ कसे राहू शकतात याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले आहे.

Powered By Sangraha 9.0