'महालक्ष्मी हत्याकांड'ने संपूर्ण देश हादरला

23 Sep 2024 17:46:10

Mahalakshmi Hatyakand

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : 
(Mahalakshmi Hatyakand) बंगळुरूमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. बेंगळुरूच्या व्यालिकावल भागात राहणाऱ्या २९ वर्षीय महालक्ष्मीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून आरोपीने तिच्या शरीराचे ३० तुकडे केल्याचे समोर आले आहे. तिच्या घरातील फ्रिजमध्ये ते ठेवल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी सध्या हे तुकडे ताब्यात घतले असून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. महालक्ष्मीशी अनैतिक संबंध ठेवलेल्या अशरफ या न्हाव्याविरोधात सध्या संशय बळावला आहे.

हे वाचलंत का? : भारतीय मुस्लिम महिलेने UNHRC मध्ये CAA चे केले समर्थन
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा महालक्ष्मीच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा ही घटना तेव्हा उघडकीस आली. त्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबत महालक्ष्मीची आई व बहीण यांना याबाबत कळवले. महालक्ष्मीचा माजी पती हेमंत दास याने या हत्येमागे नेलमंगल येथील एका सलूनमध्ये काम करणाऱ्या अशरफ नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हेमंतने सांगितले की, महालक्ष्मीचे अश्रफसोबत अवैध संबंध होते आणि त्यांनी अश्रफवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हाही दाखल केला होता. अशरफने महालक्ष्मीला ब्लॅकमेल करून अनेकवेळा त्रास दिल्याचा दावा हेमंतने केला आहे.

मीना राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या दार उघडून आत गेल्या तेव्हा घरातील गोष्टी अस्ताव्यस्त होत्या. घरभर सामान विखुरले होते. किचनजवळ किडे रेंगाळत होते, तर काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसत होते. फ्रीज उघडला तेव्हा आतमध्ये मृतदेहाचे तुकडे दिसले. त्यानंतर याबाबत पोलिसांना सविस्तर माहिती दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सदर घटनेची सध्या कसून तपास सुरु आहे. पोलीस शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीच्या प्रतीक्षेत आहे; जेणेकरून हत्येची नेमकी वेळ आणि कारण शोधता येईल. याप्रकरणी पोलिसांनी १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेज तपासले आहेत. महालक्ष्मीचा मोबाईल आणि आरोपीने वापरलेले हत्यार याचा शोध पोलीस घेत आहेत. हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत.

Powered By Sangraha 9.0