केंद्रीय नेतृत्वाखाली भारत रामराज्याकडे वाटचाल करतोय

23 Sep 2024 15:21:19

Jagdeep Dhankhar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ram Rajya)
दीवमधील घोघला येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी रविवारी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) सदनिकांचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला संबोधताना ते म्हणाले, 'नर' आणि 'इंद्र' अर्थात 'नरेंद्र' या नावाने सर्व काही शक्य झाले आहे. केंद्रीय नेतृत्वाखाली भारत रामराज्याकडे वाटचाल करत आहे.

हे वाचलंत का? : पुण्यात पार पडला 'बनारस लिट फेस्टिवल'

पुढे ते म्हणाले, भारताने गेल्या १० वर्षात केलेली मोठी प्रगती आणि महान विचारसरणीमुळे भारत हे जगाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आता पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणचे जे खरे हकदार आहेत, त्यांनाच ते दिले जाते. हाच बदल भारतरत्नच्या बाबतीतही झाला आहे. हे पुरस्कार आता योग्य लोकांना दिले जात असल्याचे देशभरातील लोकांचे म्हणणे आहे. याचा अर्थ देश बदलत आहे.
Powered By Sangraha 9.0