गणेशोत्सवानंतर दुर्गापूजेलाही इस्लामिक कट्टरपंथींचे ग्रहण!

23 Sep 2024 12:52:51

Bangladesh Durga Pooja

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Durgapooja)
बांगलादेशाच्या खुलना येथे इस्लामिक कट्टरपंथींनी दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना धमकावण्यास सुरुवात केली आहे. 'दुर्गापूजा करायची असेल तर ५ लाख रुपये द्या', अशा आशयाची पत्रे हिंदू मंदिरांना निनावी नावांकडून पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडीने एका पत्रकार परिषदेतून हिंदूंच्या सुरक्षेबद्दलची भीती व्यक्त केली होती. ती या पत्रांच्या माध्यमातून खरी ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हे वाचलंत का? : दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडीची पत्रकार परिषद

'जर पैसे दिले नाहीत, तर दुर्गापूजा होऊ दिली जाणार नाही आणि त्यांना गंभीर परिणामांना देखील सामोरे जावे लागेल.', असे निनावी नावांनी आलेल्या पत्रांमध्ये लिहिले आहे. यापत्रांबाबत प्रशासन आणि प्रसारमाध्यमांना माहिती दिल्यास त्यांचा शिरच्छेद केला जाईल, असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पैसे न दिल्यास अवामी लीगचे जॉइंट सेक्रेटरी मेहबूब उल आलम हनिफ यांच्या घराप्रमाणेच हिंदूंची घरे देखील लुटली जातील, असा इशारा देण्यात आला आहे. ही पत्रे पोस्टाद्वारे हिंदू मंदिरांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिसांकडून संबंधित पत्रांबाबतचा तपास सध्या सुरु आहे. मंदिरांच्या संरक्षणासंदर्भात त्यांनी आश्वासनही दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही मंदिर समित्यांनी धोक्यामुळे दुर्गापूजेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे तर काहींनी शांततेत पूजा आयोजित करणार असल्याचे सांगितले आहे.

Powered By Sangraha 9.0