जालना : स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे मनोज जरांगेंच्या भेटीला गेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं असून आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, आता छत्रपती संभाजीराजे हे जरांगेंच्या भेटीसाठी अंतवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत.
हे वाचलंत का? - हिंदूंच्या अंगावर याल तर आम्ही शिंगावर घेऊ! नितेश राणेंचा जिहाद्यांना थेट इशारा
यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजेंनी सरकारसह विरोधकांनाही धारेवर धरलं. ते म्हणाले की, "मनोज जरांगेंची तब्येत एवढी खालावली असतानाही सरकार मुंबईला निवांत बसलं आहे. विरोधी पक्षातील लोकंसुद्धा या सगळ्यावर बघ्याची भूमिका घेत आहेत. पण हे चालणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं आंदोलन होत आहे. मी पूर्वीही जरांगेंसोबत होतो. आजही आहे, उद्याही राहील," असे ते म्हणाले.