मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dharavi news BMC Action) धारावी येथील 'मेहबूब-ए-सुबानिया' या अनधिकृत मशिदीवर शनिवार, दि. २१ सप्टेंबर रोजी मुंबई महापालिकेतर्फे तोडक कारवाई करण्यात आली. पालिकेच्या कारवाईमुळे धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या वाहनांची तोडफोड जमलेल्या जमावाकडून करण्यात आली, त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
हे वाचलंत का? : ‘धारावीत कट्टरपंथीयांकडून हिंदू युवकाची हत्या!
धारावी येथील ९० फूट रोडवरील २५ वर्षे जुनी 'मेहबूब-ए-सुबानिया' मशिद पालिकेने बेकायदा ठरवल्यानंतर शनिवारी ती पूर्णतः पाडली जाणार होती. पालिका अधिकाऱ्यांच्या कारवाईपूर्वीच शुक्रवारी रात्री मुस्लीम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर येऊन संपूर्ण रस्ता अडवला. ही मशीद खूप जुनी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे.