सोलापूर विमानतळाच्या अंतिम टप्प्यातील कामांचा आढावा

20 Sep 2024 20:01:31
 
solapur airport
 
पुणे, दि. २० : (Solapur Airport)सोलापूर येथील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून या कामाचा आढावा नवी दिल्ली येथे एका बैठकीद्वारे घेतला. यावेळी विमानतळाच्या अंतिम टप्प्यातील कामाविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच कामाची स्थिती आणि तांत्रिक मुद्दे याचेही अवलोकन केले. उडान-आरसीएस रूट्स, एअरलाईन ऑपरेशन्स यावर बैठकीत चर्चा झाली. शिवाय सोलापूर-गोवा, सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-हैदराबाद या मार्गांवर सेवा सुरू करण्यासाठी विविध मुद्दे यावेळी चर्चिले गेले. लवकरात लवकर विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु असून सोलापूरकरांना लवकरच विमानसेवा मिळणार आहे. या बैठकीला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूरच्या अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि नागरी हवाई वाहतूक विभागाचे सहसचिव आणि विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0