हिजबुल्लाहच्या दस्तऐवजावरून ८७९ सदस्यांचा मृत्यू

20 Sep 2024 18:27:29

Hezbollah Deaths
 
बेरूत : लेबनॉन येथे पेजर स्फोट आणि वॉकीटॉकी स्फोटाबाबत एका मोठा खुलासा झाला. हिजबुल्लाहच्या गुप्त लष्करी दस्तऐवजांवरून मृतांच्या संख्येची माहिती आढळून आली आहे. दळणवळण उपकरणांच्या स्फोटात एकूण ८७९ सदस्य मारले गेले आहेत. ज्यात १३१ इराणी आणि ७९ येमेनचा समावेश असून यामध्ये एकूण २९१ वरिष्ठ अधिकारी आहेत.
 
तर हिजबुल्लाहने सांगितले की, झालेल्या हल्ल्यात दळणवळण संसाधनांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. तर प्राथमिक अहवालात सूचित केले आहे की, पेजर स्फोटात सुमारे ९ लोकं मारली गेली आहेत, तर ३००० लोकं जखमी झाली आहेत.
 
 
याचप्रकरणात हिजबुल्लाहने पुन्हा एकदा युद्धाचा विचार करणार असल्याचे सांगितले. हिजबुल्लाहचा नेता नसरहल्लाने इस्त्रायलला धमकी दिली आहे. इस्त्रायलने ८७९ सदस्यांचा मृत्यू या संघटनेसाठी मोठी अपत्तीच आहे. याचीच आता हल्लेखोरांना मोठी किंमत मोजावी लागेल असे हिजबुल्लाच्या नेत्याने स्पष्टोक्ती दिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0