आपले कार्य उपकार नसून ती साधना आहे : रमेशभाई ओझा

20 Sep 2024 15:55:51

Rameshbhai Oza - Vanavasi Kalyan Ashram

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vanavasi Kalyan Ashram)
"आपले कार्य उपकार नसून ती साधना आहे. परमेश्वराने आपल्या सर्वांना एकत्रिकत राहण्यासाठी जीवन दिले आहे. त्यामुळे आयुष्य एखाद्या पार्टनरशिपप्रमाणे जगले पाहिजे.", असे प्रतिपादन गुजरातचे प्रसिद्ध भागवत कथाकार पूज्य रमेशभाई ओझा यांनी वनवासी भागांत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधत केले.

यावेळी मंचावर राष्ट्रीय जनजाति आयोगचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य, कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सत्येंद्र सिंह, उपाध्यक्ष एच के नागु एवं तेची गुबीन, महामंत्री योगेश बापट, संगठन मंत्री अतुल जोग, मध्यप्रदेशचे जनजातीय सल्लागार समिति सदस्य उर्मिला भारती आणि हरियाणा युनिटचे अध्यक्ष राम बाबु आदी मान्यवर उपस्थित होते.

हे वाचलंत का? : ग्वालियार येथे आरोग्य भारतीचे 'अखिल भारतीय प्रतिनिधी मंडल संमेलन'

वनवासी कल्याण आश्रमच्या अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनाला शुक्रवार, दि. २० सप्टेंबर रोजी हरियाणाच्या समलखा येथे सुरुवात झाली. दर तीन वर्षांनी होणाऱ्या या परिषदेत देशभरातून एकूण दोन हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. केरळ, हिमाचल, गुजरात, अरुणाचल प्रदेश आणि अंदमानमधून वनवासी भागातील स्त्री-पुरुष कार्यकर्ता संमेलनात उपस्थित आहेत.

रमेशभाई ओझा यावेळी म्हणाले, भागवतात तीन संदेश दिले आहेत; माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे, त्याने संपूर्ण सृष्टी आणि सजीवांशी कसे वागले पाहिजे आणि निसर्गाशी कसे वागले पाहिजे. या तिन्ही क्रिया माणसाच्या त्यागाला अधिक उंचीवर घेऊन जातात ज्यामुळे समाजाचे कल्याण आणि राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते. देशाची अखंडता आणि एकता टिकून राहावी यासाठी मी सर्व ऋषी-मुनींना कथा आणि प्रवचनासाठी वनवासी क्षेत्रात बोलावतो. इतर पाखंडी लोकांनी तिथे पोहोचून त्याचा गैरफायदा घेऊ नये.


Vanavasi Kalyan Ashram

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह म्हणाले की, तीन वर्षानंतर वनवासी कल्याण आश्रमाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपण सर्व कार्यकर्त्यांनी येथूनच प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपण काम करत नसलेल्या वनवासी क्षेत्रातही आपले कार्य वाढवले पाहिजे.

देशाच्या विविध भागात वनवासी कल्याण आश्रमाचे उपक्रम व कार्यक्रमांसह विविध मुद्द्यांवर १२ सत्रांत चर्चा होणार आहे. प्रांतातील कार्यकर्ते आपापल्या कार्यक्रमांचे कथन करतील. वनवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, विविध प्रांतातील आपल्या संलग्न घटकांद्वारे, देशात १७३९४ ठिकाणी शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, स्वावलंबन इत्यादींचे २२१५२ प्रकल्प राबवत आहे.

सरसंघचालकांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप
दि. २१ सप्टेंबर सायंकाळी ६.३० वा. पारंपारिक उपासना पद्धतींचे प्रात्यक्षिक होईल. या भव्य सोहळ्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या अभिवादनाने होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी संमेलनाच्या समारोपप्रसंगी कार्यकर्त्यांना सरसंघचालकांचे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Powered By Sangraha 9.0