कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सात नव्या प्रकल्पांना मंजूरी

02 Sep 2024 18:05:34
boost-indias-agriculture-sector


नवी दिल्ली :   
    देशाच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, १३,९६६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सात मोठ्या प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली असून कृषी संशोधन, डिजिटल शेती आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.




दरम्यान, कृषी संशोधन, डिजिटल शेती आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. गेल्या आठवड्यात वैष्णवने १० राज्यांमध्ये २८,६०२ कोटी रुपये खर्चून १२ औद्योगिक स्मार्ट शहरे उभारण्यास मान्यता दिली होती, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशाच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी १३,९६६ कोटी रुपयांचे ७ मोठे प्रकल्प मंजूर केले आहेत. कृषी संशोधन, डिजिटल शेती आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने १३ हजार ९६६ कोटी रुपयांच्या सात मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

केंद्र सरकारने डिजिटल कृषी मिशनची घोषणा केली असून त्यासाठी २,८१७ कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. कृषी प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि बिग डेटा यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले निर्णय घेणे आणि शेतीची कार्यक्षमता सुधारणे हा या अभियानाचा उद्देश आहे.




Powered By Sangraha 9.0