राज्यात झिकाचे १२६ रुग्ण, नागरिक चिंतेत!

02 Sep 2024 17:00:35


Zika virus news

मुंबई :
झिका आजाराने आरोग्य विभागासह नागरिकांनाही चिंतेत टाकले आहे. कारण राज्यात झिका आजाराच्या १२६ रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक९७ रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. मात्र मुंबईत अद्याप एकही झिकाचा रुग्ण नाही. पंरतु राज्यातील झिका आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्याआरोग्य विभागामार्फत रुग्ण आढळलेल्या ३ ते ५ किमीच्या परिसरात स्क्रिनिंग करण्यात येतआहे. तसेच संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतआहेत. 


दरम्यान राज्याचा आरोग्य विभाग एडिस डासाच्या उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी कार्यरतअसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रतिबांधात्मक उपाययोजनांमध्ये  जलद ताप सर्वेक्षण मोहिम राबवली जात आहे. तसेचसंशयितांसह गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठवण्यातयेत आहेत.

झिका  रुग्णांची संख्या

पुणे-  ९७
पुणे ग्रामीण-  ९
पिंपरी चिंचवड मनपा - ६
सांगली( मिरज)- १
सोलापूर- १
कोल्हापूर - १
अहमदनगर- ११

एकूण रुग्ण नोंद १२६ 


काय काळजी घ्याल ?

- घरातील पाणी साठे वाहते ठेवावे.
- साठवलेल्या पाण्यांची भांडी कापडाने झाकून घ्यावी.
- पाणी रिकामे करता येणार नाही अशा साठ्यांमध्ये गप्पी मासे किंवाटेमिफोस या अळीनाशकांचा वापर करावा.
- रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास घाबरू नये, पंरतुत्वरीत उपचार करावा.

एडिस डासांमुळे झिका आजार होतो. त्यामुळे राज्य शासनाने दिलेल्यासूचनेप्रमाणे पालिकेकडून ही लक्षणाधारित रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित करण्यातयेत आहेत. तसेच पालिकेकडून ही एडिस डासांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी कीटकशास्त्रीय उपाययोजना राबवण्यात येत आहे.

डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी(मुंबई महापालिका) 
 
Powered By Sangraha 9.0